परिक्रमा_शैक्षणिक_संकुलात_सावित्रीबाई_फुले_जयंती_साजरी


काष्टी तालुका- श्रीगोंदा येथील मा. ना. श्री. बबनराव पाचपुते विचारधारा ट्रस्टच्या परिक्रमा शैक्षणिक संकुलात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले .
भारतात स्त्री शिक्षणाचा विचार जेव्हा येतो तेव्हा पहिलं मनात नाव येत ते म्हणजे सावित्रीबाई फुले, असे विचार आयोजित कार्यक्रमात प्रा.मेघना रायकर यांनी सर्वांसमोर मांडले, संस्थेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी श्री.अनिल पुंड, कॅम्पस डायरेक्टर, डॉ. विजय पाटील व प्राचार्य रमेश शिंदे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सूत्रसंचालन प्रा.अनुराधा पाटील यांनी केले. यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या स्तुत्य उपक्रमाचे परिक्रमाच्या अध्यक्षा डॉ. सौ. प्रतिभाताई पाचपुते, सचिव श्री. विक्रमसिंह पाचपुते, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.प्रतापसिंह पाचपुते, डॉ.तानाजी दबडे, डॉ.सुनील निर्मळ, डॉ. सुदर्शन गिरमकर, प्राचार्य मेनन यांनी कौतुक केले व अशा कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल समाधान व्यक्त केले

Leave a Reply