परिक्रमा अभियांत्रिकी महाविद्यालयामधुन ३५ विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये निवड

परिक्रमा शैक्षणिक संकुलनामध्ये आयोजित मॉशचिओ गॅस्पार्डो इंडिया प्रा. लि. या बहुराष्ट्रीय कंपनीच्या प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये ३५ विद्यार्थ्यांची निवड झाली असल्याची माहिती संस्थेचे विश्वस्त श्री. प्रतापसिंह पाचपुते यांनी दिली.

या प्लेसमेंट ड्राईव्ह बद्दल अधिक माहिती देताना परिक्रमा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे ट्रैनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी प्रा. निलेश गुणवरे यांनी सांगितले की, परिक्रमा मध्ये वर्षभर विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांचे प्लेसमेंट ड्राईव्ह चे आयोजन करण्यात येते. नुकत्याच झालेल्या शेती संबंधित अवजारे बनवणाऱ्या बहुराष्ट्रीय (इटालियन कंपनी) मॉशचिओ गॅस्पार्डो इंडिया प्रा. लि. या कंपनीने ३५ विद्यार्थ्यांची निवड केली . त्यासाठी कंपनीचे प्रॉडक्शन मॅनेजर श्री. निलेश रोडे यांचे सहकार्य लाभले. मॅकेनिकल व इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी विभागासाठी झालेल्या या कॅम्पस ड्राईव्ह साठी परिक्रमा अभियांत्रिकी महाविद्यालयासह संजीवनी अभियांत्रिकी महा. कोपरगाव , डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महा. पुणे , सिहंगड अभियांत्रिकी महा. लोणावळा, एस. व्ही. पी. एम. अभियांत्रिकी महा. माळेगाव, पी. डी. ई. ए’स अभियांत्रिकी महा. मांजरी, पुणे आदी नामवंत महाविद्यालयातील एकूण ११८ विद्यार्थी सहभागी झाले होते.
परिक्रमाचे संचालक डॉ. विजय पाटील यांनी परिक्रमा अभियांत्रिकी महाविद्यालयात कॅम्पप्स प्लेसमेंट ची प्रथम वर्षांपासून तयारी करून घेण्यात येत असल्याचे सांगितले. तसेच विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांबरोबर संस्थेचा सामंजस्य करार करण्यावर भर आहे. सर्व यशस्वी व निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे माननीय आमदार बबनरावजी पाचपुते साहेब , संस्थेच्या अध्यक्षा डॉ. प्रतिभाताई पाचपुते, सचिव श्री. विक्रमसिंह पाचपुते, विश्वस्त श्री. प्रतापसिंह पाचपुते व मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. अनिल पुंड यांनी अभिनंदन केले आहे. हा प्लेसमेंट ड्राईव्ह यशस्वी होण्यासाठी परिक्रमा अभियांत्रिकी महाविद्यालामधील ट्रैनिंग प्लेसमेंट सेल विभागाचे प्रा. निलेश गुणवरे व त्यांच्या सहकार्यांनी विशेष प्रयत्न केले.

Leave a Reply