परिक्रमा शैक्षणिक संकुलात ‘सावित्रीबाई फुले’ यांच्या “स्मृतिदिन” निमित्त विनम्र अभिवादन ‘
काष्टी तालुका- श्रीगोंदा येथील मा. ना. श्री. बबनराव पाचपुते विचारधारा ट्रस्टच्या परिक्रमा शैक्षणिक संकुलात आज दि. १० रोजी ‘स्री शिक्षणाचा पाया रचणा-या , अनंत अडचणींवर मात करत मुलींसाठी पहिली शाळा सुरू करणा-या पहिल्या भारतीय अध्यापिका तसेच महिलांच्या सबलीकरणासाठी ज्यांनी शिक्षणाची दारे खुली केली त्या सावित्रीबाई फुले यांचा स्मृतिदिन’ साजरा करण्यात आल्याची माहिती प्राचार्य डॉ. सुनिल निर्मळ यांनी दिली. या कार्यक्रमाचे नियोजन प्रा. रजिया खान व प्रा.मेघना रायकर यांनी केले. या कार्यक्रमात प्रथमेश वाळुंजकर या विद्यार्थ्यानी ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले’ यांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले. या स्तुत्य उपक्रमाचे परिक्रमाच्या अध्यक्षा डॉ. सौ. प्रतिभाताई पाचपुते, सचिव श्री. विक्रमसिंह पाचपुते, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.प्रतापसिंह पाचपुते, मुख्य प्रशासकीय अधिकारी श्री. अनिल पुंड, संकुल संचालक डॉ. विजय पाटील, डॉ.तानाजी दबडे, प्राचार्य रमेश शिंदे, डॉ. सुदर्शन गिरमकर, प्राचार्य मेनन यांनी कौतुक व समाधान व्यक्त केले.