“परिक्रमा” च्या विद्यार्थ्यांची आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल लॉकडाऊनमध्ये शेतीसाठी घरीच बनवला पॉवर टिलर !
“
“परिक्रमा” च्या विद्यार्थ्यांची आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल लॉकडाऊनमध्ये शेतीसाठी घरीच बनवला पॉवर टिलर
काष्टी :-
श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील परिक्रमा अभियांत्रिकी महाविद्यालयात इंजिनीअरिंगच्या द्वितीय वर्षात शिकणाऱ्या सुरज शिंदे या विद्यार्थ्याने कोरोना महामारी च्या काळात लॉकडाऊनचा सदुपयोग केला. या काळात सूरज ने आपले वडील नानासाहेब शिंदे यांच्या सहाय्याने मिनी पॉवर टिलर बनविला.
लॉकडाऊन च्या काळात स्वस्थ न बसता काहीतरी नवीन व उपयुक्त यंत्रनिर्मिती करावी अशी संकल्पना सुरज याने केली आपले वडील नानासाहेब शिंदे यांच्या शेती अवजारे बनविणे व दुरुस्त करणे व्यवसायात मदत करत असताना या पिता-पुत्रांना शेतीमध्ये आंतरमशागतीसाठी पावर टिलर बनविण्याची संकल्पना सुचली यातून उपलब्ध असणाऱ्या साधनांचा वापर करून या पिता-पुत्रांनी मिनी पॉवर टेलर ची निर्मिती केली. यामध्ये पाच हॉर्स पॉवरचे फोर स्ट्रोक इंजिन मेटल स्टीलची च्यासी वापरून दोन फूट रुंद व सहा फूट लांबीचे हे पॉवर टिलर बनविले आहे.
या मशीनचे डिझाईन सूरजने स्वतः बनविले असून याची निर्मिती सुरज व वडील नानासाहेब यांनी मिळून केली आहे. शेतीमध्ये आंतरमशागत करणे, बेड तयार करणे, औषध फवारणी करणे, अशा कामासाठी हे उपकरण फायदेशीर ठरत आहे. हे उपकरण बनवत असताना स्वदेशी पार्ट चा वापर व कमीत कमी इंधनामध्ये जास्त काम हे सूत्र वापरल्याचे सुरज सांगतो. मेकॅनिकल इंजिनियरिंगचा उपयोग आपल्या परिसरातील समस्या सोडवून त्यामधून स्वयंरोजगार निर्मिती साठी होत असल्याचे देखील सुरज सांगतो या माध्यमातून भविष्यात शेती अवजारे यंत्र बनविण्यासाठी मेकॅनिकल इंजिनिअरिंग उत्तम असल्याचे सूरजने सांगितले तर नानासाहेब शिंदे यांनी सुरज च्या तंत्र शिक्षणाचा उपयोग रोजगार व व्यवसायाबरोबरच परिसरातील समस्या सोडविण्यासाठी होत असल्याने सुरज चे शिक्षण मोलाचे असल्याचे सांगितले.
“परिक्रमा” चे विद्यार्थी ग्रामीण विकासात सक्रिय सहभाग नोंदवत असल्याने माजी मंत्री आमदार श्री.बबनराव पाचपुते यांनी समाधान व्यक्त केले. तर संस्थेच्या अध्यक्षा डॉ सौ.प्रतिभा पाचपुते, सचिव श्री.विक्रमसिंह पाचपुते विश्वस्त श्री.प्रतापसिंह पाचपुते यांनी सुरज व नानासाहेब शिंदे यांचे अभिनंदन केले परिक्रमा चे संचालक डॉ.विजय पाटील, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ.अनिल पुंड, मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाचे विभाग प्रमुख प्रा.विनोद तोडकरी व सर्व कर्मचारी यांनी या दोघांचे कौतुक केले.